Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी विजय थोरवडे


पाटण/ प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती पाटण तालुका कार्यकारिणी निवडीची बैठक पाटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पार पाडली. 

यावेळी समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विजय थोरवडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी नामदेव चव्हाण, सचिवपदी प्रा. रवींद्र सोनावले, स्वागताध्यक्षपदी दिपक भोळे, दिपक गायकवाड, खजिनदारपदी आनंदा कांबळे, दिपक माने, प्रसिद्धीप्रमुखपदी प्राणलाल माने तर कार्यकारिणी सदस्यपदी मधुकर गायकवाड, यशवंत दाभाडे, नंदकुमार देवकांत, संगीता रोडे, रुक्मिणी देवकांत यांच्या निवडी करण्यात आल्या.

या बैठकीस तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष व संंघटनांंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.