Breaking News

माहीजळगावला चारा छावणी सुरू


कर्जत/प्रतिनिधी: दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांसाठी चारा आणि पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.चारा, पाणी मिळण्यासाठी शेतकर्‍यांना मोठी कसरत करावी लागत होती. यातून शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे चारा छावणी सुरू करण्यात आली आहे.

राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने ही छावणी सुरु करण्यात आली आहे. उद्घाटन प्रसंगी नवनाथ शिंदे, अमोल बामणे, भिमराव शिंदे, किशोर कोपनर, संजय शेटे, काशीनाथ शिंदे, कल्याण जाधव, रामभाऊ शेटे, संतोष घोडके, छगन जाधव, विठ्ठल तोरडमल, सुनील शिंदे, नामदेव हाके, निवेदक दादा शिंदे, अनिल कोपनर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. छावणीमध्ये पहिल्याच दिवशी माही जळगाव, पाटेगाव, टाकळी आणि परिसरातील दोनशे तीस लहान-मोठी जनावरे दाखल झाली. ज्या शेतकर्‍यांनी छावणीत जनावरे दाखल केले आहेत. त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस छावणी चालक बाळासाहेब देशमुख, संतोष कुरुळे, राम शिंदे, अमोल बामणे, परशुराम तोरडमल यांनी व्यक्त केला आहे.