Breaking News

कामगार कल्याण मंडळाचा उपक्रम स्तुत्य - सुभाषराव जोशी


कराड,(प्रतिनिधी) : कामगारांमध्ये त्याच्यासाठी असलेल्या योजना, उपक्रम व माहिती याबाबत जागृती करण्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने आयोजित मेळाव्याचा उपक्रम स्तुत्य असूल त्यांचा लाभ घेऊन कामगारांनी आपले भविष्य उज्वल बनवावे, असे उदगार अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांनी काढले.

येथील अर्बन बँकेच्या कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय कोल्हापूर याच्या वतीने आयोजित कृतिशील कामगार व आस्थापना प्रतिनिधीचा सन्मान सोहळा व कामगार प्रबोधन मेळाव्याच्या उदघाटप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बॅकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, जितेंद्र जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे, महेश वेल्हाळ , सलीम शेख, ड. भिमराव शिंदे याच्यासह कामगार उपस्थित होते. 

यावेळी कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन केले. कार्यक्रमात कोल्हापूरचे शाहीर सदाशिव निकम यांना मान्यवरांच्या हस्ते गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आला. मेळाव्यात सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील डॉ. जयंत करंदीकर यांचे सुखी जीवनाची गुरूकिल्ली या विषावर व्याख्यान झाले.