Breaking News

रॉकेल विक्रेत्याविरुद्ध वर्षभरानंतर गुन्हा दाखल


शेवगाव/प्रतिनिधी : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील साडे तीन हजार लिटर रॉकेलची परस्पर विल्हेवाट
लावल्याच्या तक्रारीवरून रॉकेल विक्रेते भानुप्रताप अ‍ॅण्ड संन्स विरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल एक वर्षानंतर हा गुन्हा दाखल झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

याबाबत शेवगाव तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातील अब्वल कारकून संदीप, मधुकर चिंतामण यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने घाऊक रॉकेल विक्रेते भानुप्रताप अ‍ॅण्ड सन्स या एजन्सीला 17 डिसेंबर 2017 रोजी 14 हजार लिटरचा पुरवठा केला होता. यापैकी काही साठा पुरवठा विभागाने अर्थघाऊक विक्रेत्यांना वाटप करण्याच्या सूचना संबंधित एजन्सीला दिल्या होत्या. मात्र, रॉकेल मिळाले नसल्याच्या तक्रारी संबंधित अर्थघाऊक विक्रते त्यांनी तहसीलदारांकडे केल्या होत्या. या तक्रारींची चौकशी करुन जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना अहवाल सादर करण्यात आला. 

या अहवालाची दखल घेऊन जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी दिलेल्या सूचनेनुसार पुरवठा विभागाचे अव्वल कारकून चिंतामण यांनी फिर्याद दिली. त्यानुसार भानुप्रताप अ‍ॅण्ड सन्स एजन्सीचे चालक शेवगाव येथील यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्याने गुन्हा नोंदविण्यात आला.