Breaking News

मारहाण करून दुचाकी हिसवणार्‍या तिघांना कोठडी


उंब्रज / प्रतिनिधी : येथील एका हॉटेलवरून जेवण करून घरी जाण्याकरिता निघालेल्या कोर्टी येथील युवकास तीन जणांनी मारहाण केली. त्याच्याकडील दुचाकी जबरदस्तीने काढून घेतल्या प्रकरणी तीन जणांना उंब्रज पोलिसांनी अटक केली.त्यांना कराड येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली.

खंड्या उर्फ खंडू प्रल्हाद जाधव (वय 30), विशाल लक्ष्मण कुकले (वय 21), विशाल बळीराम माने (वय 29, सर्व. रा.उंब्रज, ता.कराड) यांना अटक करण्यात आली आहे.गणेश किसन पवार 29 रा.कोर्टी ता.कराड याने दिलेल्या फिर्यादीनुसार, गणेश हा उंब्रज येथील एका हॉटेलवरून जेवण करून दूचाकीवरून (क्रमांक एमएच11 एवाय 8125) घरी जात होता. तेव्हा वरदराज मंगल कार्यालयासमोरील सेवारस्त्यावर विशाल कुकले, खंड्या व विशाल माने या तिघांनी फिर्यादीस अडवले. त्याच्या दूचाकीची जबरदस्तीने चावी काढून घेतली. त्याला मारहाण केली.असे फिर्यादीत म्हणले होते. याप्रकरणी तीन जणांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी या 3 संशयित आरोपींना अटक केली असून त्यांना कराड न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी दिली, असे पोलिसांनी सांगितले.