Breaking News

बेरोजगारी हटविण्यासाठी मुद्रा योजना प्रभावीकराड /प्रतिनिधी : तरुण पिढीला बेरोजगारीतून सोडवण्यासाठी एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निर्माण केली आहे. ती म्हणजे मुद्रा बँक योजना होय. बेरोजगारी दूर करण्यासाठी ही योजना प्रभावी आहे, असे मत मुद्रा बँक समन्वय समितीचे अशासकीय सदस्य सुदर्शन पाटसकर यांनी व्यक्त केले.
कराड येथे मुद्रा बँक योजनेसंदर्भात माहिती देण्यासाठी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा नियोजन अधिकारी बी.जी. जगदाळे, जिल्हा अग्रणी बँकेचे नितीराज साबळे, जिल्हा सहाय्यक श्री. गवळी, संतोष मिसाळ, श्रीकांत साबळे, सुरज जिरंगे, कल्पेश पावसकर, फारूक सय्यद, तानाजी देशमुख, प्रकाश शेवाळ, आनंदराव जगताप, मोहन पुरोहिते, अभिजित म्हत्रे, सागर लाखे, महमद शेख, विष्णू पाटसकर, शशिकांत घोडके आदींची उपस्थिती होती.
यावेळी जिल्ह्यातील 404 कोटी 4 लाख कर्जाचे यावेळी वितरण करण्यात आले. यावेळी 467 कोटी इतक्या कर्जाचे  उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. तर जनधन योजना, विमा योजना, अश अनेक योजनांची माहिती देण्यात आली.