Breaking News

लोणंद परिसरात चोरटयांचा धुमाकूळलोणंद / प्रतिनिधी : लोणंदमध्ये गेल्या पंधरा दिवसामध्ये चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून गुरुवारी रात्री अज्ञात चोरटयांनी तुळजाभवानी मंदीर फोडले असून तेथील कपाटातून पंचधातूचा देवीचा मुकूट चोरुन नेला आहे तर पेट्रोल पंपावर उभा असणारा आयशर टेम्पो चोरला आहे तसेच बसस्थानक परिसरातून महिलेच्या पर्समधुन एक लाख सदतीस हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरटयांनी लंपास केली आहे या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

 गुरुवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास लोणंद एसटी स्टँडवर सातार्‍यास जाणार्‍या एसटीमध्ये जात असताना रुपाली कांतीलाल राऊत (वय 29, रा. म्हावशी, ता खंडाळा) यांच्या खांद्याला अडकवलेली पर्स उघडून तीन तोळ्याचे गंठण ,दीड तोळ्याचा नेकलेस, एक सोन्याचा दांडा असलेली नथ एक लाख सदतीस हजार सातशे रुपये किंमतीचा अज्ञात चोरटयानी चोरून नेला. याची नोंद लोणंद पोलिसांत झाली आहे.