Breaking News

विधायक कार्यातून समाजसेवा हीच भाजपाची भूमिका : श्‍वेता महाले

चिखली,(प्रतिनिधी): समाजसेवेचे एक प्रभावी माध्यम म्हणून राजकारण करून
लोकशाही अधिक बळकट करणे ही समाधानाची आवश्यकता आहे. याच जाणीवेतून
पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जनतेची कामे करीत असतात. विधायक
कार्यातून समाजसेवा करणे हीच भाजपाची भूमिका असल्याचे प्रतिपादन भाजपा
प्रदेश कार्यकारिणी सदस्या तथा जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती
श्‍वेताताई महाले पाटील यांनी केले.  9 मार्च रोजी पक्षाच्या वतीने
तालुक्यातील विविध धार्मिक संस्थानांना पाण्याच्या टाक्याचे वितरण
करण्यात आले. या प्रसंगी श्रीमती महाले आपले विचार व्यक्त करीत होत्या.
तालुक्यातील विविध धार्मिक संस्थानांमध्ये हजारो भाविक दर्शनासाठी येत
असतात. सध्या उन्हाळा लागत असून प्रत्येकाला पिण्याच्या पाण्याची
आवश्यकता भासत आहे. या दुष्काळी पाश्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने
पाण्याच्या टाक्या देण्यात आल्या. तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागात
भारतीय जनता पार्टी च्या वतिने कोलारा सिध्देश्‍वर संस्थान, गोद्री येथिल
रेणुकादेवी संस्थान, पळसखेड सपकाळ गुरुदेव आश्रम, मोहाडी महादेव संस्थान,
डोगरशेवली सोमनाथ संस्थांन, रानअंत्री साप्तानंद महाराज संस्थान, देऊळगाव
घुबे रामकृष्ण मिशन, कोलारा रामभाऊ महाराज संस्थान, एकलारा किसनदेव
संस्थान, सवणा महादेव संस्थान, धोत्राभनगोजी ग्रामपंचायत यांना 2 हजार
लिटर पाण्याच्या टाकीचे वितरण सिध्देश्‍वर संस्थान कोलारा येथे केले.
         याप्रसंगी संजय चेके पाटील जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, डॉ
प्रतापसिंह राजपूत जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, सुनील पोफळे भाजपा तालुका
अध्यक्ष, मा गजाननभाऊ ईगळे पंचायत समिती सदस्य, मनिषाताई सपकाळ सदस्या प.
समिती, सुहास शेटे माजी नगराध्यक्ष, साहेबराव पाटील, डॉ शिवशंकर खेडेकर,
डॉ कृष्णकुमार सपकाळ, डॉ दामोधर भवर, विजय खरे जिल्हा संयोजक सोशल मिडिया
युवामोर्चा, अमोल परीहार,भगवान सोळंकी युवामोर्चा तालुका उपाध्यक्ष,
अनंथा सोळंकी, रमेश सोळंकी भिकु लोळगे यांच्या सह संस्थानचे पदाधिकारी व
इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सुनील
पोफळे यांनी केले.