Breaking News

गुणवरेच्या ब्लूम स्कुलमध्ये विज्ञानप्रदर्शन, बालबाजार उपक्रम मोठ्या उत्साहात


फलटण,  (प्रतिनिधी) : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने गुणवरे, ता. फलटण येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे नुकतेच विज्ञान प्रदर्शन व विद्यार्थ्यार्ंंच्या सहभागातून बालबाजार उपक्रम यशस्वी करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे उपप्रादेशिक विभागाचे वाहन निरीक्षक संभाजीराव गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ईश्र्वरकृपा शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी सौ. साधना गावडे, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ, माता पालक संघाचे सदस्य, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या विज्ञान प्रदर्शनामध्ये सिया वाघमोडे, आदिती हंकारे, तेजस गोरवे यांनी अनुक्रमे विज्ञान दिवस का साजरा करतात?, डॉ. सी व्ही रमण यांचे जीवनकार्य व भारतातील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ या विषयावरील पीपीटी प्रेसेंटेशन सादर केले. विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे वैज्ञानिक प्रकल्प व उपकरणे सादर केली. तसेच चरीज्ञशीं ऊरू मध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या फळभाज्या, फळे, किराणा व खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणले होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी व्यवहारज्ञानाचे धडे घेतले. पालकांनीही विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारच्या भाज्या, फळे, वस्तू खरेदी केल्या. या उपक्रमाबरोबरच पालकांनी विज्ञान प्रदर्शन पाहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण, सृजनशीलता, व्यवहारज्ञान, संभाषण कौशल्य आदी गुण विकसित होण्यासाठी हा उपक्रम नक्कीच मदत करेल, असा अभिप्राय सर्वच पालकांनी दिला. दरम्यान मराठी राजभाषा दिनानिमित्त विद्यालयात विद्यार्थ्यांची भाषणे, कविता गायन, मातृभाषेचे महत्व सांगणार्‍या नाटिका, मराठी गाण्यांवर नृत्य, म्हणींचा खेळ असे कार्यक्रम घेण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका ज्योती आढाव यांनी केले, रूपाली चांगण यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य शेखर गायकवाड, विज्ञानशिक्षिका आशा सोनवणे, अश्र्विनी शेंडे व इतर शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.