Breaking News

भालगाव गटात चारा छावणीचा दुष्काळ


खरवंडी कासार/प्रतिनिधी
दुष्काळ भिषण पडला असून पाथर्डी तालुक्यातील पुर्व भागात भालगाव गटात चारा छावणी चालवण्यास स्वंयसेवी संस्था सामाजिक ट्रस्ट लोकप्रतिनिधी यांची उदासीनता असल्याचे दिसून येत आहे.

याचे मुख्य कारण म्हणजे शासनाने घातलेल्या जाचक अटी? सध्या एका सर्कलमध्ये एक चारा छावणी असा शाषनाचा अध्यादेश आहे. परंतु आगामी काळात मागेल त्याला व गाव तेथे चारा छावणी देण्याचा शासन विचार करत आहे. पाथर्डी तालुक्यात बहुतांश ठीकाणी चारा छावण्या मंजूर आहेत. परंतु भालगाव गटात भगवानगड पंचक्रोशीतील येणारे गाव या ठीकाणी पिण्याच्या पाण्याविना व चार्‍याविना मुकी जनावर जगावे कसे असा प्रश्‍न शेतकर्‍यांना भेडसावत आहे. जशा उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तसतसा पाणी व चारा याची गरज भासू लागली आहे. पाथर्डी-शेवगाव मतदारसंघाच्या आ. मोनिका राजळे यांनी भालगाव गटात लक्ष घालून स्वंयसेवी संस्था यांना चारा छावण्या मंजुर कराव्यात. अशी मागणी नितीन किर्तने यांनी केली आहे.

तसेच सोसायटीचे संचालक वामन कीर्तने पंचायत समिती सदस्य किरण खेडकर, साईबाबा मल्टीस्टेट चेअरमन सुनिल खेडकर, राजेंद्र जगताप, बाळासाहेब गोल्हार, सुनील अंदुरे यांनी गाव तिथे चारा छावणी मंजुरीसाठी लवकरच आ. मोनिका राजळे व तहसीलदार नामदेव पाटील यांना भेटणार असून चारा छावण्या संदर्भातील जाचक अटी शिथील करण्यासाठी निवेदन देणार असल्याचे सांगितले.