मंदिर उभारणीपर्यंत आंदोलन कायम; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पवित्रा; सरकारवरही विश्‍वास


नवीदिल्लीः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सह-सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी राम मंदिराच्या मुद्यावर यापुढेही आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जोशी म्हणाले, की विद्यमान सरकारच्या (केंद्रातील भाजप सरकार) निष्ठेबाबत कोणताच प्रश्‍न नाही. मंदिर निर्मिती पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहील. दरम्यान, याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिरप्रश्‍नी मध्यस्थीसाठी 3 सदस्यीय समिती नियुक्त केली आहे.
भैयाजी जोशी यांनी राम मंदिरासाठी मोदी सरकारवर पूर्ण विश्‍वास व्यक्त केला. ते म्हणाले, की सत्तेत असणार्‍यांचाही राम मंदिराला विरोध नाही, असे आम्ही मानतो. त्यांच्या प्रतिबद्धेबाबत आमच्या मनात कोणतीच शंका नाही, असे म्हणत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोदी सरकारवर विश्‍वास दर्शवला आहे. अयोध्या वादावर मध्यस्थी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 3 सदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे. यावर जोशी म्हणाले, की मंदिरासाठी उचलण्यात आलेल्या कोणत्याही पावलांचे आम्ही स्वागत करतो. मंदिर त्याच जागी होईल आणि त्यासाठी आम्ही कोणतीच तडजोड करणार नाही. मध्यस्थ जर त्या दिशेने गेले, तर आम्ही त्यांचे स्वागत करू. जेव्हा 3 सदस्यीय समिती यावर कार्यवाही सुरू करेन त्या वेळी सर्व समजेल.

या समितीचे अध्यक्ष सर्वोच्च न्याायलयाचे निवृत्त न्या. एफ एम कलीफुल्ला आहेत. इतर दोन सदस्यांमध्ये आध्यात्मिक गुरू श्री. श्री. रविशंकर आणि ज्येष्ठ विधिज्ञ श्रीराम पांचू यांचा समावेश आहे. योगायोगाने मध्यस्थी समितीतील तिघेही तमीळनाडूतून येतात. मंदिर निर्मितीपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सांगताना ते म्हणाले, की 1980-90 पासून जे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत मंदिर पूर्ण होणार नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील. न्यायालयाने तत्परतेने यावर निर्णय घ्यावा.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget