Breaking News

नागरिक व उमेद्वारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे - पाटोळे


शिरूर | प्रतिनिधी: शिरूर लोकसभा मतदार संघात ३८५ केंद्रे असणार असुन त्यासाठी अडीच हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची पुर्णपणे तयारीझाली असुन प्रशासन लोकसभा निवडणुक प्रक्रियेसाठी सज्ज आहे. नागरिक व उमेद्वार यांनी या काळात आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी केले. शिरूर तहसिल कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी तहसिलदार गुरू बिराजदार, नायब तहसिलदार दिलीप जाधव आदी उपस्थित होते.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीच्या पार्शवभूमीवर प्रचारकाळातील सभा, मेळावे, बैठकांवर शासकीय यंत्रणेचे लक्ष असणार असुन व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणारअसल्याने हा खर्च शासकीय यंत्रणा ठरवतील तो उमेदवाराच्या खर्चात धरण्यात येणार आहे. सार्वजनिक व खाजगी जागेवर लावलेले पोस्टर, बॅनर, झेंडे काढून टाकण्याबाबत तसेच आदर्शआचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सुचना बैठक घेऊन संबंधीतांना माहिती दिली असल्याचे सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी पाटोळे यांनी सांगितले. तर आचारसंहिता भंगाबाबतचीतक्रार नोंदविण्यासाठी या कक्षाचे प्रमुख म्हणुन नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अॅलिस पोरे यांची नियुक्ती करण्यात आली असुन निवडणुक संदर्भातील कामांसाठी प्रशासकीय इमारतीत एकखिडकी योजना सुरू करण्यात आली असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

निवडणूक काळात गैर प्रकारांना आळा घालण्यासाठी व असले प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने दखल घेतलेली असून पाच फिरते पथक व तीन स्थिर पथके तयार करण्यात करण्यात आले आहेत.या पथकात मॅजिस्ट्रेट दर्जाचे अधिकारी, पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी, व व्हिडीओ ग्राफर असणार आहेत. तसेच तीन ठिकाणी चेकपोस्ट असणार आहेत.

- श्रीमंत पाटोळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी