जाहिरातींवर मोदींनी उधळले कोट्यवधीः मायावती


लखनऊ : बहूजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जाहिरातींवर 3044 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप केला आहे. जाहिरातींवर खर्च होणारा पैसा उत्तर प्रदेशसारख्या मागासवर्गीय राज्यातील प्रत्येक खेड्यात शिक्षण व आरोग्य सेवा पुरविण्यासाठी खर्च केला असता, तर त्याहून अधिक चांगले काम झाले असते; परंतु मोदी यांनी कोट्यवधी रुपये केवळ जाहिरातींवर उधळले असल्याचा दावा मायावती यांनी केला आहे.

मोदी सध्या विकासकामांच्या उद्घाटनांमध्ये व्यस्त आहेत. हा जनतेचा पैसा मागास राज्यातील गावात शिक्षण आणि चांगले आरोग्य देण्यासाठी वापरला जाऊ शकत होता; परंतु मोदी यांना हा पैसा सामाजिक कल्याणासाठी वापरण्यापेक्षा भाजपच्या जाहिरातींवर पैसे खर्च करणे अधिक गरजेचे वाटत असल्याचे ट्विट केले आहे.
भाजप सरकारचे अपयश झाकोळण्यासाठी आणि जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारकडून सध्या अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. जेणेकरून गरिबी आणि बेरोजगारी या अतिमहत्त्वाच्या मुद्यांची ऐन निवडणूकीच्या दिवसांत चर्चा होणार नाही; पण अशा वेळी जनतेने सतर्क राहणे अतिशय गरजेचे असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget