मोदी सरकार ही देशात राष्ट्रीय आपत्ती- शरद पवार


नाशिक: देशात आजवर पहिला असा पंतप्रधान बघितला आहे की विरोधी पक्षातील लोकांचा सन्मान न राखता सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना योग्य वागणूक न देता त्यांच्यावर टीका टिपणी करतात. आजवर देशात विरोधकांचा सन्मान केला जात होता. मात्र सध्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे. हे सुसंस्कृत लोकांचे लक्षण नाही. प्रधानमंत्री हा देशाचा असतो तो कुठल्या पक्षाचा नसतो मात्र देशातील मोदींचे सरकार ही राष्ट्रीय आपत्ती असल्याची टीका खा. शरद पवार यांनी केली.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज हॉटेल एमरॉल्ड पार्क येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संयुक्तिक बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले तसेच राज्यांच्या प्रमुखाने विरोधकांशी सन्मानाने वागविण्याची गरज आहे मात्र ते देखील राज्यात दिसत नाही. छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला जामिनावर आहात अशी भाषा केली जाते हे सुसंस्कृत लोकांचे लक्षण नाही अशी टीका त्यांनी केली. छगन भुजबळ हे अडचणीतून बाहेर पडले असतांना महाराष्ट्रात लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ते लढता आहे ही गौरवाची बाब आहे असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, लोकशाहीला संसदीय पद्धतीने दिशा देण्याचे काम जवाहरलाल नेहरू यांनी केले त्यामुळे आजवर लोकशाही टिकली. जगात भारताला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम त्यांनी केली त्यासाठी त्यांनी कुठलीही तडजोड केली नाही. आधुनिक विज्ञानाचा पुरस्कार त्यांनी केला. इंदिरा गांधी यांनी देशाचा इतिहास नाही तर भूगोल बनविला इतकी कामे त्यांनी केली आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील गरीब जनता ही इंदिरा गांधी यांच्याशी एकरूप झाली होती. त्यामुळे त्या लोकप्रिय बनल्या होत्या. मात्र आजचे प्रधानसेवक की देशात गेल्या साठ वर्षात काय केले अशी भाषा करतात हे कोणालाही न पटणारे आहे अशी टीका त्यांनी केली. 

ज्या घरण्यावर आजचे पंतप्रधान टीका करतात त्या इंदिरा गांधी देशाला स्थिर सरकार दिले, देशाची प्रतिष्ठा वाढविली, राजीव गांधी यांनी आधुनिकतेची कास धरल्याने आज देशात तंत्रज्ञान विकास झाला त्यांनी देशासाठी योगदान दिले त्यांच्यावर टीका केली जाते.हे सुसंस्कृत पणाचे लक्षण नसून या भूमिकेला सक्त विरोध करून आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे ते एकत्रही आले आहे. त्यामुळे सर्व निर्णय एकत्रित रित्या घेतले जात आहे. असे सांगून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते माझ्यासाठी सारखेच आहे त्यात कुठलाही दुजाभाव नाही असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget