Breaking News

शेतमालकावरच ऊस जाळल्याचा गुन्हा


सातारा / प्रतिनिधी : येथील शाहुपुरी पोलिस ठाण्यांत दाखल तक्रारीचा गैरफायदा घेत येथील बसाप्पा पेठेतील सूरजसिंह परदेशी या शेतमालकावरच ऊ स जाळल्याचा गुन्हा दाखल झाला असून या अजब प्रकाराची शहर परिसरात सर्वत्र चर्चा सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील राधिका रोडलगतच्या बसप्पा पेठेतील परदेशी कुटुंबात आपसातील शेतजमिन वाटणीवरुन वाद सुरु आहे. ही बाब न्यायप्रविष्ट असून वाटणीस स्थगिती देवून जैसे थे स्थिती ठेवण्याचा हायकोर्टाचा निर्णय झाला आहे. या निर्णयानुसार शेतजमिन ज्याच्या ताब्यात आहे ती तशीच राहू देणे आवश्यक असतानाही प्रतिवादी विठ्ठलसिंग यांनी वाटणीचा प्रयत्न केला. हाय कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केला त्यानंतर सूरजसिंह गजेंद्रसिंह परदेशी यांच्यावर ऊ स जाळण्याचा खोटा गुन्हा दाखल केला सूरजसिंह परदेशी यांच्या नावावर ऊ स पिकपाणी नोंद असून त्याच्यांच नावावर गून्हा दाखल केला आहे. शिवाय गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या दाखल गुन्ह्याचा गैरफायदा घेत उचलत जाळलेला ऊ स चोरण्याचा प्रकार घडला. यामध्ये प्रतिवादी यांचे काही अनोळखी साथीदार यांच्या सह 25 ते 26 जणांच्या टोळीने ऊ स चोरुन विकला. आणि ऊ स मालकास स्वताचा ऊस जाळल्या प्रकरणी अटकपूर्व जामीण घ्यावा लागला. या घटणेनंतर संबंधीत मालकाने जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे धाव घेतली असून त्यांनी याबाबतचे निवेदनही दिले असल्याचे सूरजसिंग परदेशी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.