Breaking News

अवैध धंद्यावर पोलिसांचे छापे


शिरूर/प्रतिनिधी: रांजणगाव गणपती येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील पोलिस ठाण्याच्यावतीने रांजणगाव गणपती परिसरातील अवैध धंद्यावर पोलिस पथकाने छापे टाकले असता सुमारे 11 हजार रुपये किंमतीचा देशी व विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. संबंधित गुन्हेगारांवर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मनोज कुमार यादव यांनी दिली.

रांजणगाव पोलिस स्टेशनच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाई विषयी माहिती देताना अवैध धंदा करण्यासाठी आपली जागा भाड्याने देणार्‍या घरमालकावर देखील गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिस निरीक्षक मनोज यादव यांनी सांगितले. तसेच पोलिस कारवाईत 61 छापे टाकून एकूण 67 जनावर कारवाई करून त्यांच्याकडून एक लाख 26 हजार रुपये किंमतीचा गावठी विदेशी तसेच देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. यापुढे ही पोलिसांची अवैद्य दारू धंद्यांच्या विरोधात अशीच कारवाई चालू राहणार आहे. संबंधित गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांची कोणत्याही प्रकारची गय न करता त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक मनोज यादव यांनी सांगितले.