Breaking News

बापट यांना बुद्धिबळाचे प्रेरणास्थान पुरस्कार


अहमदनगर/प्रतिनिधी: येथील जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट यांना महाराष्ट्र प्रेरणा दिन समिती पुणे यांच्या वतीने महाराष्ट्रातील बुद्धिबळाचे प्रेरणास्थान या पुरस्काराने गौरविण्यात आले. नगरमधील हॉटेल आयरिश मध्ये उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार प्रदान सोहळा झाला.

 यावेळी जिल्ह्यातील उत्कृष्ट बुद्धिबळ खेळाडू प्रज्वल गायकवाड, प्रणित कोठारी, सुयोग वाघ, चैतन्य पांढरकर, ईश्‍वरी वखारे, साक्षी कुंटे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन बुद्धिबळ संघटनेचे विश्‍वस्त पारुनाथ ढोकळे यांनी केले. आभार सुबोध ठोंबरे यांनी मानले. यावेळी श्याम कांबळे, डॉ.अण्णासाहेब गागरे, उमेश गावडे, संजय पांढरकर, नवनीत कोठारी, प्रकाश गुजराती, ज्योती आणेकर, श्रीकांत वाखारे, कुटे सर, नगरे सर, शुभदा ठोंबरे, अनुराधा बापट, अमृता वाघ आदी उपस्थित होते.