Breaking News

पोलिसाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी वकिलाला सक्तमजुरीची शिक्षा


सातारा / प्रतिनिधी : कानून के हाथ लंबे होथे है! याची प्रचिती दुष्काळी भागातील माण तालुक्यात आली आहे. एका पोलीस आधिकर्‍यांना धक्काबुकी केल्याप्रकरणी न्यायालयाने वकिलाला सक्तमजुरीची व सोहळा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

पाच वर्षांपूर्वी दहिवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना स. पो. नि. समाधान चवरे यांना गुन्हयातील एक आरोपीला तात्काळ कारवाई करून अटक करण्यात यावी यासाठी ऍड जिजाबा नारायण जाधव हे दि. 5 मार्च 2014 रोजी सायंकाळी सहा वाजता पोलीस ठाण्यात आले होते. त्यानंतर तपास अधिकारी स. पो. नि. चवरे यांच्याशी त्यांचा वाद झाला. या वादातून शिवीगाळ व धक्काबुकी करण्यात आली, अशी लेखी तक्रार चवरे यांनी दाखल केली होती. पाच वर्षे हा खटला दहिवडी न्यायालयात सुरू होता. काल या खटल्याचा निकाल लागला. फिर्यादी स. पो. नि. चवरे यांना नुकसान भरपाई म्हणून पाच हजार रुपये देण्याचे आदेश दिले. सदर निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी ऍड. जाधव यांनी अपील केल्याची माहिती दिली आहे. पोलीस आधिकर्‍यांना धक्काबुकी केल्याप्रकरणी वकिलांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्याचे प्रकरण सातारा जिल्हात प्रथमच घडले असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या स. पो.नि. चवरे हे पुणे जिल्ह्यातील वडगाव-निंबाळकर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.