Breaking News

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती अनुदान लाभ देण्यासाठी अव्वल


राहुरी/प्रतिनिधी :कांदा बाजारभावाने हैरान झालेला बळीराजा वर्षभरापासून संकटात होता. उत्पादन खर्चापेक्षा विक्री झालेल्या कांद्यास कमी बाजारभाव मिळत गेल्याने 2018 या वर्षात कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले. कांदा उत्पादकांच्या स्थितीचा अंदाज घेत राज्यसरकारने कांदा अनुदान देण्याची घोषणा केली.

 व याविषयी विक्री झालेल्या बाजारसमित्यांमध्ये विक्री झालेल्या कांद्याच्या विक्रीपट्ट्यासह अर्ज सादर करावेत असे निर्देशित करण्यात आले होते. नोव्हेंबर 2018 ते 15 डिसेंबर 2018 या दिड महिन्यासाठीचे अनुदान प्रतिक्विंटल 200 रुपयांप्रमाणे जाहिर झाल्याने कांदा उत्पादकांनी बाजार समित्यांकडे अर्ज सादर केले. यात राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती यंदाही शेतकर्‍यांना सुविधा पुरवत अनुदान अर्ज स्विकारुन प्रत्यक्षात अनुदान लाभ देण्यासाठी अव्वल ठरल्याचे दिसून आले.

नंतर राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अरुण तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत कांदा अनुदान प्रक्रीया, लाभार्थी शेतकरी अर्जस्विकृती सुविधा व प्रत्यक्षात धनादेश स्विकृती याबाबत सविस्तर विवेचन करत राहुरी बाजार समितीने कांदा उत्पादकांच्या अनुदानप्रक्रीयेची माहीती दिली. असता सभापती तनपुरेंनी सांगितले 1 नोव्हेंबर 2018 ते 15 डिसेंबर 2019 या दिडमहिना कालावधीत राहुरी बाजार समिती मुख्यआवार व वांबोरी उपबाजार आवारात ज्या शेतकर्‍यांनी कांदा विक्रीस आणला त्या एकूण 8794 लाभार्थींना व एकूण क्विंटल 234554 वजन असलेल्या कांद्याचे एकूण अनुदान 4 कोटी 79 लाख 3 हजार चारशे रुपयांच्या पहिल्या हप्त्याचे धनादेश जिल्हाबँकेकडे सुपूर्द केले. व त्यांतर 1 कोटी 17 लाख 71 हजार रुपयांचे धनादेश आज रोजी जिल्हाबँकेकडे सूपूर्द करत आहोत. शेतकर्‍यांचे अर्जात नमुद केल्याप्रमाणे ज्या बँकेत खाते आहे. तेथे अनुदान जमा होवून लाभार्थींना प्रत्यक्षात अनुदान मिळणार आहे. बाजार समितीकडे कांदा अनुदानपोटी 15 डिसेंबर नंतर पून्हा एकूण 6 हजार 182 अज आज अखेर दाखल झालेले आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदतीत वाढ होत जावून ती मुदत 31 मार्च अखेर आहे.

अनुदान अर्ज स्विकारताना शेतकर्‍यांना त्रास होवू नये अर्जघेणे व स्विकृती तसेच त्रुटी राहू नयेत यासाठी मार्गदर्शनासह ऑनलाईनसह अत्याधुनिक सर्व त्या सुविधांची तयारी राहुरी बाजारसमितीने करताना आवश्यक तो कर्मचारी वर्ग अनुदानअर्ज स्विकृती कामी नेमून शेतकर्‍यांना सुविधा दिल्या व अर्ज स्विकारुन प्रत्येक अर्जाची विभागीय वर्गवारी वजन, भाव एकूण अनुदान आदींची छाननी होत जे प्रत्यक्षात लाभार्थी आहेत अशा अनुदानप्राप्त लाभार्थींचे धनादेश जिल्हानिबंधकांकडून प्राप्त होत राहुरीच्या सहा.निबंधक श्री.नांगरे यांचेकडून ते बाजार समितीकडे आल्यानंतर राहुरी बाजार समितीने आलेले धनादेश अहमदनगर जिल्हा बँकेचे अधिकारी गोरक्षनाथ मंडलिक व किरण मदगे यांचेकडे सुपूर्द केले आहेत.

राहुरी बाजार समितीने शेतकर्‍यांना विविध सुविधा देताना शेतकर्‍यांच्या सोयीसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. तारकंपाउंड, रस्तेकाँक्रीटीकरण, खडीकरण, सेलहॉल, स्वच्छतागृह, पिण्याचेपाणी जनावरांच्या पिण्याचे पाणी, तसेच याठिकाणी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा बाजारसमिती संलग्न पेट्रोलपंप आदी सुविधा पुरवल्या जावून राहुरी बाजार समिती विस्तारीकरणासह विकासाकडे नवीन पाऊल टाकून कोट्यावधींचे काम प्रत्यक्षात सुरु होवून शेतकर्‍यांना अत्याधुनिकतेसह सुविधा पुरवण्यासाठी सज्ज असल्याचेही सभापती अरुण तनपुरेंनी पत्रकार परिषदेत जाहिर केले. याप्रसंगी बाजार समिती संचालक मधुकर पवार, महेंद्र तांबे, डॉ.केरु पानसरे, बाजार समिती सचिव प्रकाश डूक्रे उपस्थित होते.