Breaking News

डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याचा गळीत हंगामाची सांगता


कडेगांव/ प्रतिनिधी : साखर उद्योग हा ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व तोडणी वाहतूकदाराच्या सहकार्यामुळेच टिकून आहे, असे मत आमदार मोहनराव कदम यांनी व्यक्त केले.
वांगी(ता.कडेगांव)येथील डॉ पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याच्या 19व्या गळीत हंगाम सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते. महेंद्र लाड,उपाध्यक्ष सयाजीराव धनवडे, बापूसो पाटील, पी. सी. जाधव, युवराज कदम आदी उपस्थित होते.

आ. कदम म्हणाले, या गळीत हंगामात 149 दिवसात 9 लाख 17हजार 471मे. टन ऊसाचे गाळप केले असून 11लाख 24हजार क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. सरासरी उतारा 12-28 असा मिळाला आहे. 90 टक्के गाळप हे कारखाना कार्यक्षेत्रातील आहे, 10टक्के ऊस हा कार्यक्षेत्राबाहेरील आहे. कडेगांव तालुक्यातून 64टक्के, पलूस तालुक्यातून 17-30टक्के, खानापूर तालूक्यातून 8टक्के असा ऊस या गळीत हंगामात उपलब्ध झाला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे, पण सर्वाच्या सहकार्यामुळेच हा गळीत हंगाम यशस्वी करू शकलो. संचालक दिलीपराव सूर्यवशी, पंढरीनाथ घाटगे, पोपटराव महिंद, भगवान जगदाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्वागत प्रशांत कणसे यांनी केले. प्रास्ताविक कार्यकारी संचालक शरद कदम यांनी केलेय. आभार भगवान मोहिते यांनी मानले.