Breaking News

श्रीनाथ विद्या मंदिर शाळेत दंत तपासणी शिबीर


अहमदनगर / प्रतिनिधी : येथील वसंत टेकडी भागातील श्रीनाथ विद्या मंदिर प्राथमिक शाळेत श्री सत्य साई सेवा समिती बाल विकास यांच्या वतीने तसेच यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी समितीच्या बालविकास प्रमुख डॉ.राजलक्ष्मी दुधगी, अशोक कुरापाटी, अमर सप्तर्षी, ललीता आडेप, सुमन अन्वेकर, रजनी सप्तर्षी, डॉ.निखील बोंबले, मुख्याध्यापिका अनिता सिद्दम आदी उपस्थित होते. प्रास्तविक मुख्याध्यापिका अनिता सिद्दम यांनी केले. श्री सत्यसाई समितीने आभार मानले.