Breaking News

पल्स पोलिओला उत्स्फूर्त प्रतिसाद

Image result for पल्स पोलिओ

टिळकनगर / वार्ताहर

तालुक्यातील टिळकनगर मध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पल्स पोलिओ मोहिमेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सकाळ पासूनच लसीकरणकेंद्रावर पालकांच्या लहान मुलांना घेऊन रांगा लागल्या होत्या. टिळकनगर येथील अंगणवाडी 264 क्रमांक

वतीने दोन दिवस आधीपासून गावामध्ये पल्स पोलिओ बाबत जनजागृती करत पत्रके व फलक लावण्यात आले होते. पल्स पोलिओ अभियानाला रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमाराससुरवात करण्यात आली. याप्रसंगी रांजणखोल ग्रामपंचायतीच्या महिला सदस्या सविता सिध्दार्थ बागुल, परवीन जाकीर शेख, रजिया शकील पठाण, यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभकरण्यात आला. यावेळी पोलिओ संदर्भात पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी परिसरातील 250 बालकांना शंभर टक्के लसीकरण करण्यात आले. यावेळी आरोग्य केंद्राच्या आशा प्रतिभागणेश शिंदें , आशा कडूभाई प्रमोद हिवाडे, अंगणवाडी सेविका सायरा शेख मदतनीस लता शेळके यांनी लसीकरण केले.