Breaking News

शहीद रवींद्र धनावडे यांना मरणोत्तर शौर्यचक्र प्रदान


मेढा / प्रतिनिधी : मोहाट, ता. जावली येथील शहीद जवान रवींद्र बबन धनावडे यांना मरणोत्तर शौर्यचक्र प्रदान करुन नुकतेच गौरवण्यात आले. राजधानी दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांच्या हस्ते शहिद जवान धनावडे यांच्या कुटुंबियांनी हे शौर्यचक्र स्विकारले.
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील पोलीस वसाहतीला दहशतवाद्यांनी दि. 27 ऑगस्ट 2017 रोजी घेराओ घातला होता. त्या वेळी लष्करी जवान रवींद्र धनावडे यांनी दहशतवाद्यांशी दोन हात करीत जोरदार पराक्रम केला होता. मात्र त्यामध्ये त्यांना वीरमरण आले. त्यांच्या स्मरणार्थ मोहाट गावी त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. नुकतेच दिल्ली येथे त्यांना मरणोत्तर शौर्यचक्र प्रदान करण्यात आले. हे शौर्यचक्र राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांच्या हस्ते त्यांच्या पत्नी मेघा धनावडे, आई जनताबाई धनावडे, मुलगी श्रध्दा, मुलगा वेदांत या कुटुंबियांनी स्विकारले. शहीद रवींद्र यांना मरणोत्तर शौर्यचक्र मिळाल्याचा सर्व जावलीकरांना सार्थ अभिमान वाटत असून सोशल मीडियावरही शहीद धनावडे यांच्या शौर्याला अभिवादन करण्यात येत आहे.