Breaking News

प्रा. सुरेश निंबाळकर यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान


देऊर / प्रतिनिधी येथील श्री. मा. कृ. माने कनिष्ठ महाविद्यालय (व्य.शि.) येथील प्रा. श्री. सुरेश नामदेव निंबाळकर यांना सेकडरी स्कूल को. ऑप. क्रेडिट सोसायटी मुंबई यांच्या वतीने 2018-19 मध्ये दिला जाणारा ‘ कर्मवीर भाऊ राव पाटील आदर्श शिक्षक ’ पुरस्काराने कोकण म्हाडाचे अध्यक्ष ना. श्री. बाळासाहेब पाटील व सिने अभिनेत्री ऋतुजा बागवे यांच्या शुभहस्ते दामोदर हॉल परेल मुंबई येथे सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन श्री. चंद्रकांत पाटील होते. तसेच सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी, कर्मचारी शिक्षक उपस्थित होते.

या यशाबद्दल श्री मुधाईदेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. धैर्यशिल जगताप, चेअरमन भिमराव कदम, सचिव हणमंतराव कदम, शालेय समितीचे अध्यक्ष किसनराव कदम, विश्वस्त सर्जेराव कदम ऍड. संजीव कदम, पदाधिकारी प्राचार्य विजयसिंह गायकवाड, पर्यवेक्षक नितीन भंडारी शिक्षक प्रतिनिधी प्रकाश कदम, सर्व शिक्षक कर्मचारी वृंद, ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी हार्दिक अभिनदन केले.