Breaking News

मोळा येथे यश कॉन्व्हेंट द्वारे, नेत्र व स्त्रीरोग तपासणी शिबीर


 मेहकर,(प्रतिनिधी): शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टीने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजेच आरोग्य होय. यामध्ये असंतुलन निर्माण झाल्यास रोग जडतात. वन नीतीनुसार वृक्ष लागवड नसल्याने, वातावरणामध्ये अनेक प्रकारचे बदल होत असल्याने, विविध प्रकारच्या आजारांना जनता तोंड देत आहे. यासाठी सामाजिक संस्था आरोग्य शिबिराचे आयोजन करीत असतात. 

मोळा येथील यश कॉन्व्हेंटचे संस्थापक अध्यक्ष संजय जाधव यांनी सामाजिक बांधिलकी व समाजसेवा या वृत्तीतून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व स्व.वसंतरावजी नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मोळा व परिसरातील जनतेच्या सुदृढ स्वास्थाकरिता नेत्र व स्त्रीरोग तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये नेत्रतज्ञ डॉ.गजानन शेळके यांनी 165 नेत्र रुग्णांचे नेत्र तपासले तर स्त्री रोग तज्ञ डॉ.गीता शेळके यांनी 85 महिलांची तपासणी करुन विविध आजारांचे रोगनिदान केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलीस पाटील शरद पाटील हे होते. 

तर प्रमुख उपस्थितांमध्ये सौ सुनिता गजानन शेळके सरपंच मोळा, संस्थापक अध्यक्ष संजय जाधव, दलितमित्र शिवाजीराव नवघरे, कैलास शेळके, श्याम इंगळे, नामदेव धोटे, संदीप नागरिक, संतोष धोटे, संतोष शेळके, मुख्याध्यापिका किरण धोटे आदींचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी धोटे यांनी केले. तर आभार प्रदर्शन किरण वानखेडे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यश कॉन्व्हेटचे शिक्षकेतर कर्मचारी व गावातील मंडळींनी मोलाचे सहकार्य केले.