Breaking News

राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेत संजीवनी पाॅलीटेक्निकचे यश


कोपरगांव/श. प्रतिनिधी: संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या इलेक्ट्रिकल विभागातील अंतिम वर्षातील विदयार्थ्यांनी बनविलेल्या ‘हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेईकल’ या प्रकल्पानेनाशिक येथिल जवाहर इन्स्टिटयूट ऑफ टेक्नाॅलाॅजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाने घेतलेल्या राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्प स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. पदवी आणि पदविका अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेेल्या विध्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफइन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली.
कोल्हे यांनी हे यश मिळवणाऱ्या मथारू हरप्रित सिंग, वैभव दिलीप गिरासे व विशाल कालू धोत्रे यांचा छोटेखानी सत्कार करून त्यांच्या या प्रकल्पाचे कौतुककेले. यावेळी प्राचार्य मिरीकर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख प्रा. साहेबराव दवंगे व पालक हरप्रित सिंग उपस्थित होते. रू. ७००० रोख, मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक आणि रू ३०,००० चे कोर्स कुपन्स असे बक्षिसाचे स्वरूप आहे.