Breaking News

बेकायदा ताडी विक्री विरोधात कारवाई


खंडाळा/ प्रतिनिधी : पारगाव ता.खंडाळा येथे बेकायदा ताडी विक्री करणार्‍या ठिकाणी खंडाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हणंमत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज धडक कारवाई करण्यात आली.यावेळी 262 लिटर ताडी, एक मोटर सायकल, तीन मोबाईल व दोन हजार 460 रुपये रोख रक्कम अशी एकूण 33 हजार 560 चा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी संशयित आरोपी प्रकाश दादा गायकवाड हे पळुन जाण्यास यशस्वी ठरले.तर राजेंद्र अय्याप्पा भंडारी (वय 26 रा.वाठार कॉलनी),यल्लप्पा तायप्पा पवार( वय 26,रा.जिंती,ता फलटण ) व गोपाळ व्यंकटी ईभत्ते (वय 24 रा.निरा.ता.पुरदंर) यांना पोलीसांनी अटक केली आहे.यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक हणमंत गायकवाड,पोलिस उपनिरीक्षक महेश कदम पोलिस नाईक भोईटे, पोलीस हवालदार धुमाळ ,पोलीस नाईक सचिन वीर यांच्या पथकाने ही कारवाई केली.