Breaking News

जिल्ह्यात साडेतीन हजार नवमतदारांची नोंदणी


सातारा, (प्रतिनिधी) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत कुणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी अद्यापर्यंत ज्यांची मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अशा वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. काल (शनिवार) झालेल्या विशेष मतदार नोंदणी मोहिमेत जिल्ह्यात तीन हजार 570 नवीन मतदारांनी नोंदणी केलेली आहे.

ज्या नागरिकांनी अद्याप मतदारयादीत नावनोंदणी केलेली नाही व ज्या मतदाराचे वय दि. 1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्षे पूर्ण झाले आहे. अशा नागरिकांनाही मतदारयादीत नाव नोंदणी करावी. या कार्यक्रमांतर्गत सर्व मतदान केंद्रावर, मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहुन नागरीकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्विकारणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्र्वेता सिंघल यांनी केले आहे.