Breaking News

आवश्यक ठिकाणी स्वच्छता गृहाची उभारणी करु -गटाणीपाथर्डी/प्रतिनिधी
बुधवारी आठवडे बाजारासह इतर दिवशीही शहर परिसरासह तालुक्यातून मोठ्या प्रमाणात येणार्‍या पुरुषासह महिलांची गावात मोठी वर्दळ असते. मात्र, स्वच्छता गृह अभावी सर्वाचीच मोठी कुंचबना होत आहे. विशेषता महिला भगिनींची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे. ही मागणी पुर्ण करून समस्या दुर करण्यासाठी आ.मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे यांच्या सहकार्याने विर सावरकर मैदान सह आवश्यक ठिकाणी स्वच्छता गृहाची उभारणी करु असे प्रतिपादन नगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती संगिता संतोष गटाणी यांनी केले.
महिलादिनानिमित्त नगरपालिकेच्या महिला कर्मचारी यांचा महिला व बाल कल्याण समितीच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी सभापती गटाणी बोलत होत्या. यावेळी बांधकाम समितीच्या सभापती मंगल कोकाटे, नगरसेविका सुनिता बुचकुल उपस्थित होत्या.
पुढे बोलताना गटाणी म्हणाल्या की, दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच तालुका व परिसरातून हजारो नागरिक विविध दैनंदिन कामासाठी शहरात येत असतात. विशेषता स्वच्छता गृह अभावी महिला भगिनींची मोठी कुंचबना होत आहे. ही समस्या दुर करण्यासाठी पहिल्या टप्प्यात विर सावरकर मैदान येथील पुरुषांच्या जुन्या स्वच्छता गृहाच्या जागेवर पुरुषांसह महिलांसाठी स्वच्छता गृहाची उभारणी करु. तसेच शहरातील शक्य असणार्‍या आवश्यक ठिकाणी आ.मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे सर्व नगरसेवक व नगरसेविका यांच्या सहकार्याने स्वच्छता गृहाची उभारणी करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे सो.गटाणी यांनी सांगितले.