धर्म्या ऊर्फ तुक्या शिंदेच्या टोळीला मोक्का


लोणंद / प्रतिनिधी : सालपे (ता. फलटण) येथील वयोवृद्ध महिलेच्या खून आणि दरोडा प्रकरणी तपास करताना रोहित ऊर्फ टक्या चिवळ्या पवार (वय 19, रा. चौधरवाडी, ता. फलटण जि. सातारा) हा आरोपी निष्पन्न झाला. त्यास सदर गुन्ह्यात अटक करून तपास केला असता त्याने हा गुन्हा विशाल ऊर्फ मुक्या भीमराव पवार (रा. बहादूरवाडी ता. वाळवा, जि. सांगली), बाप्या कल्याण ऊर्फ परश्या शिंदे (रा. खंडाळा, जि. सातारा), चॉद ऊर्फ सुरज जेल्या ऊर्फ जालिंदर पवार (रा. बडेखान, ता फलटण जि. सातारा), धर्म्या ऊर्फ नकट्या तुक्या शिंदे (रा निंभोरे, ता फलटण जि. सातारा) यांच्या साथीने केल्याचे निष्पन्न झाले.

सदर आरोपींचा पूर्वेतिहास पडताळून पाहिला असता त्यांनी लोणंदसह फलटण शहर, फलटण ग्रामीण , कोडोली जि. कोल्हापूर, वडगाव निंबाळकर, जि. पुणे या पोलीस ठाण्यात दरोडा, बलात्कार, जबरी चोरी, घरफोडी तसेच दरोड्यासह खुन आदी गंभीर प्रकारचे एकुण 12 गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांची माहिती गोळा केली असता सदरचे गुन्हे धर्म्या ऊर्फ नकट्या तुक्या शिंदे (रा निंभोरे ता फलटण) याने आपल्या साथीदारांच्या सहाय्याने संघटीत टोळी बनवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व दहशत निर्माण करण्यासाठी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या गुन्ह्यांची माहिती संकलित करून लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि गिरिश दिघावकर यांनी फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करावी यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्फत विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे पाठवण्यात आलेला तो मंजूर करण्यात आलेला आहे.

फलटण विभागातून उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी गुन्हेगारी टोळ्यांना कायद्याचा वचक रहावा म्हणून आतापर्यंत चार गुन्हेगारी टोळ्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget