Breaking News

‘सत्याग्रह से स्वच्छाग्रह’ मल्टिमिडिया चित्र प्रदर्शन


पुणे : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या रिजनल आऊटरीच ब्युरो, पुणे कार्यालयाच्यावतीने घोले रोड येथील राजा रविवर्मा कलादालन येथे आयोजित सत्याग्रह से स्वच्छाग्रह या मल्टिमिडिया चित्र प्रदर्शनाला खासदार अनिल शिरोळे यांनी आज भेट दिली. 

यावेळी पुणे महानगरपालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या रिजनल आऊटरीच ब्युरोचे संचालक संतोष अजमेरा, पीआयबीचे उपसंचालक महेश अय्यंगार आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी शिरोळे यांनी चित्र प्रदर्शनाची पाहणी केली. ते म्हणाले, महात्मा गांधीजींचे कार्य, त्यांचा इतिहास सध्याच्या तरुण पिढीला समजण्यासाठी तसेच स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल. गांधीजींनी सुरु केलेला स्वच्छतेचा वसा पुढे नेण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. अजमेरा म्हणाले, महात्मा गांधीजींच्या 150 व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रिजनल आऊटरीच ब्युरो, पुणे कार्यालयाच्यावतीने गांधीजींचे कार्य व त्यांच्या विचारांचा प्रसार होण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून हे चित्रप्रदर्शन भरविण्यात आले आहे.