Breaking News

खासदार सदाशिव लोखंडे देशाचे मंत्री व्हावेत-काका कोयटे


कोपरगाव ता/प्रतिनिधी : खासदार सदाशिव लोखंडे यांनी पाच वर्षात केलेले काम त्यांचा अभ्यास व दूरदृष्टीकोण पाहता ते देशाचे मंत्री व्हावेत असा आशावाद राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी व्यक्त केला.

देशातील 24 कृषी प्रोड्युसर कंपन्यांपैकी आठ कंपन्या शिर्डी मतदार संघा करिता मंजूर करण्याचे ऐतिहासिक काम लोखंडे यांनी केले आहे. कोपरगाव शेतकरी कृषी प्रोडूसर कंपनीच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार सदाशिव लोखंडे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, शिवसेनेचे नितीनराव औताडे ,व्यापारी महासंघाचे सचिव सुधीरजी डागा, डॉ.चेतन लोखंडे, माजी नगराध्यक्ष बबनराव वाजे, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे , नगरसेविका सपना मोरे, वर्पे ताई, वर्षा शिंगाडे, शिवसेनेचे अस्लम शेख, सनी वाघ, उपस्थित होते.

सहकारी साखर कारखान्याच्या धर्तीवर केंद्र शासनाने पालकत्व घेतलेल्या शेतकर्‍यांची इतर पिकांसाठी प्रोसेसिंग ग्रेडींग पॅकेजिंग मार्केटिंगची जबाबदारी असलेल्या या कंपनीमुळे शेतीची नवी क्रांती होणार असून आम्ही नाशिक येथे सुरू केलेल्या प्रक्रिया पॅकेजींग यूनीट हे कोपरगावला आणून शेतकर्‍यांच्या मालाचे ग्रेडिंग पॅकिंग करून मार्केटिंगसाठी आम्ही निश्‍चित मदत करू असे आश्‍वासन काका कोयटे यांनी दिले.

लोखंडे यांनी मतदारसंघात शाळांना 77 कम्प्युटर दिली. 100 पेक्षा जास्त हाय मॅक्स दिले. मात्र त्यांना उद्घाटने करता आले नाही. त्यावर कोयटे म्हणाले खासदारांना मार्केटिंग करता येत नाही. मार्केटिंग कोपरगाव तालुक्यानेच करावी. एक लाखाचे हाय मॅक्स लावून उद्घाटनासाठी आम्ही दोन लाख खर्च करतो त्यावर खूप हशा झाला.

खासदार लोखंडे यांनी बोलताना साडेचार वर्षात निळवंडे कालवे गोदावरी कालवे शेतकर्‍यांच्या कंपनीची स्थापना श्रीरामपूर येथील पासपोर्ट कार्यालय त्याचबरोबर श्रीरामपूर येथील नव्याने निर्माण होत असलेल्या साई खेमानंद मेडिकल फाउंडेशन हे गरीब रुग्णांकरिता मोफत सेवा देणारे देशामधील पहिले हॉस्पिटल राहील बरोबरच संत रोहिदास कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे माध्यमातून बेरोजगारांना नवीन संधी मिळेल अशी माहिती दिली.

लाभक्षेत्रात फक्त दहा टक्के ऊस उत्पादक शेतकरी शिल्लक राहिले. शेतकर्‍यांपेक्षा राजकारण्यांना या कारखान्याचा फायदा झाला. मग खासदार लोखंडे यांनी दहा हजार महिलांच्या मालकीच्या या कंपनीच्या माध्यमातून डाळिंब द्राक्ष पेरू चिकू कांदा सोयाबीन कडधान्या सर्व पिकांची प्रोसेसिंग ग्रेडींग मार्केटिंग यासाठी हा सहकारी कारखानाच असून शेतकर्‍यांच्या मालकीचा या कंपनीतून एक नवीन क्रांती होणार असल्याचे सांगितले.

व्यापारी महासंघाचे सुधीर डागा यांनी कोपरगावच्या शेतकर्‍यांचा माल आम्ही प्राधान्याने बाजारपेठेत विक्रीसाठी सर्व प्रकारचे सहकार्य कंपनीला करणार असून कार्यास शुभेच्छा दिल्या. डॉ. चेतन लोखंडे यांनी अभ्यासपूर्वक भाषणाने या कंपनीचे भविष्यातील व साई खेमानंद मेडिकल फाउंडेशनचे काम अतिशय चांगले राहील अशी चर्चा शेतकर्‍यांमध्ये होती. यावेळी भरत मोरे, किरण खर्डे, पोपट गोर्डे, राहुल होन, विजय गोर्डे, अस्लम शेख, सनी वाघ, गगनजी हाडा, प्रफुल्ल शिंगाडे, कालविंदर दडियाल, बाळासाहेब साळुंके, गोरख टेके, अशोक डुबे, धर्माभाऊ जावळे, मधुकर टेके, बबनराव खर्डे, अविनाश पानगव्हाणे उपस्थित होते.