कोकण क्षेत्रातील पर्यटन व आर्थिक विकासासाठी पूर्ण वचनबद्ध - सुरेश प्रभू


मुंबई: रत्नागिरी नागरी विमानतळ तयार करण्यासाठी संरक्षण मंत्रालय, महाराष्ट्र राज्य सरकार आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण सारख्या सर्व भागधारकांशी बोलणी करून उडान योजनेच्या प्रादेशिक वाहतूक योजनेंतर्गत रत्नागिरी विमानतळास सक्रिय करण्यात येणार आहे. आरसीएस ऑपरेशन्स सुरू करण्यासाठी पॅसेंजर टर्मिनल, ऍप्रॉन आणि टॅक्सी वे तयार करणे तसेच विमान आणि प्रवाशांना हाताळण्यासाठी आधारभूत सुविधा प्रदान करण्यासाठी एमआयडीसी कार्यरत राहणार आहे.

प्रभु यांनी सांगितले की, आम्ही रत्नागिरी येथून लवकर विमान सेवा सुरु करण्यासाठी पूर्ण वचनबद्ध आहोत. रत्नागिरी-मुंबई-रत्नागिरी मार्गावर हवाई वाहतुकीसाठी उडान 3.1 अंतर्गत निविदा मागवल्या गेल्या आहेत. नागरी टर्मिनल बांधण्याचे काम आणि नेव्हीगेशन सुविधांच्या स्थापनेची कार्यवाही करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली जाणार आहे. आम्ही कोकणच्या विकासासाठी बांधील आहोत आणि त्यासाठी लवकरात लवकर विमान सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कोकण क्षेत्रातील पर्यटन व अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दोन्ही विमानतळ कार्य्रन्वित करणार असून या मुळे नक्कीच कोकणाचा विकास होईल.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget