Breaking News

काश्मीरमधील चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान

Related image

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील 4 ठिकाणी गुरूवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. शोपिया जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, तर हंदवाडा येथील चकमकीत एक दहशतवाद्याला मारले आहे. 

शोपियांमध्ये केंद्रीय राखीव दल, लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिस यांच्याकडून संयुक्त कारवाई केली जात आहे. या वेळी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. अद्याप या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे. काश्मीर पोलिसांनी शोपियां जिल्ह्यातील केलर भागात दहशतवाद्यांविरोधात संयुक्त कारवाई सुरू केली होती. या वेळी झालेल्या चकमकीत अगोदर दोन दहशतवाद्यांचे मृतदेह आढळून आले आणि त्यानंतर आणखी एका दहशतवाद्याचा मृतदेह सापडला. या ठिकाणी आणखी काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, हंदवाडा येथील यारू भागातही चकमक सुरू आहे. या भागाची सुरक्षा जवानांनी घेराबंदी केली आहे. येथे एका दहशतवाद्याला मारले असून त्याच्याकडे एके-47 सापडली आहे.