Breaking News

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत वालुथ गावाने केले 11 तलाव गाळमुक्त


कुडाळ / प्रतिनिधी : गाव जलयुक्तशिवार योजने अंतर्गत वालुथ तालुका जावली येथिल सरपंच तसेचअखिल भारतीय सरपंच परिषदेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष समाधान पोफळे यांनी गावच्या बाजूला असणार्‍या ओढ्यावरील 11 तलावांमधून हजारो टन गाळ काढून गाळमुक्त तलाव ही योजना राबवली. 

यातून निघालेला हजारो टन गाळ शेतकर्‍यांनी स्वखर्चाने वाहतूक करून शेती विकसित करणेसाठी वापरला तसेच जवळपास 900 ट्रॉली गाळ सरपंच समाधान पोफळे यांनी स्वखर्चाने वाहतूक करून 80 वर्षे पासून प्रलंबित असणार्‍या करहर बाजारपेठेशी जोडणार्‍या वालुथ करहर या रस्त्यावर भर करून हा रस्ता तयार करण्यात आला. गावचा विकास करायचा मनात असेल तर आपोआप इच्छा प्राप्त होऊन मार्गही मिळतात, याचीच प्रचिती जावळी तालुक्यातील वालुथ गावचे सरपंच व ग्रामस्थांना आली. आज इतका भराव कोणत्याही अनुदानाची वाट न पाहता स्वखर्चाने रोडवर टाकून ग्रामस्थांना व गावातील लोकांना एकत्रित करून 80 वर्षापासून प्रलंबित असणारा वालुथ करहर रस्ता सरपंच समाधान पोफळे यांनी काढण्यासाठी पुढाकार घेतला. त्याला गावकर्‍यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. दरवर्षी पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी गावच्या विकासासाठी व गावच्या शेतीसाठी खर्ची झाले पाहिजे, हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून गावच्या सरपंचांनी व ग्रामस्थांनी या ओढ्यामधील गाळ काढला. 

आता या ओढ्यामध्ये गावाच्या शेतीला पुरेल इतकं पाणी जमा होणार आहे परिसरातल्या विहिरीही या पाण्याने तुडुंब भरणार आहेत जलयुक्तशिवार योजना सर्वत्र जोरदार सुरू असताना वालुथ गाव यामध्ये कुठेही मागं पडलं नाही. चारी बाजूने पाण्याचा स्तोत्र वालूथच्या या ओढ्यातून वाहत होता. 

हिच नस ओळखत या ओढ्यातील गाळ काढून गाव जलयुक्तशिवार योजनेमध्ये बसवत गावांचा पाणी प्रश्र्न निकाली काढण्याबरोबरच वालुथ करहर रस्त्या पूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न वालुथ गावचे सरपंच तसेच अखिल भारतीय सरपंच परिषद सतारा जिल्याचे उपाध्यक्ष समाधान पोफळे यांनी केला.