Breaking News

खासगी सावकारीप्रकरणी वडूजला 12 जणांविरोधात गुन्हा


वडूज / प्रतिनिधी : खासगी सावकारांच्या त्रासास कंटाळून वडूज येथील कापड व्यापार्‍याने थेट जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे धाव घेतल्यानंतर याप्रकरणी 12 संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी तीन जणांना पोलीसांनी तात्काळ अटक केली आहे. या प्रकरणामुळे ‘ मनी व मसल ’ पॉवरच्या जोरावर अवैद्य धंदे करणार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी, वडूज येथील शेतकरी चौकात वैभव जगन्नाथ पवार (वय 38) यांचे विशाल गारमेंट नावाचे कापड दुकान आहे. या कापड दुकानाच्या माध्यमातून पवार कुटुंबिय गेली 20 वर्षे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. 2016 पर्यंत त्यांचा व्यवसाय चांगल्या पध्दतीने चालू होता. 2016-17 या आर्थिक वर्षात आलेल्या मंदीच्या लार्टमुळे त्यांचा व्यवसाय तोट्यात जावू लागला. व्यापार्‍यांची देणी भागविण्यासाठी त्यांनी अंकुश शिंगाडे (रा. शिंगाडवाडी), अशिष बनसोडे, आकाश जाधव, बकाश्या जाधव, गणेश गोडसे, अंकुश तुपे, रामभाऊ काळे, संग्राम उर्फ बबन गोडसे, विनोद पवार, सलमा डांगे (सर्व रा. वडूज) सचिन बाबुराव शिंदे, अरुण कणसे (दोघेही रा. मुंबई) यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले. यापैकी काही जणांच्या मुद्दल व व्याजाची फेड झाली आहे. मासिक 10 टक्के व्याज घेवूनसुध्दा सावकारांचे समाधान होत नव्हते. त्यामुळे काहीजण पवार यास फोनवरुन तर काहीजण समक्ष येवून पैश्यासाठी घरी येवून तगादा लावत होते. 

श्री. पवार यांना दमदाटी व शिवीगाळ करण्याबरोबरच घरातील महिलांना त्रास देण्यापर्यंत काही गणांची मजल गेली होती. या प्रकारास कंटाळून श्री. पवार यांनी थेट जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुुते यांच्याकडेच धाव घेतली होती. जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानंतर तातडीने चक्रे फिरली व शनिवारी रात्री उशिरा वरील 12 जणांच्या दरम्यान तक्रारदार श्री. पवार यांना एका सावकाराकडून मारहान झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या पवार यांनी थेट जिल्हा पोेलीस प्रमुखाकडे धाव घेतल्याचे समजते. पवार यांच्याप्रमाणेच शहर परिसरातील अनेकांना खासगी सावकार खुलेआम गंडा घालत असल्याचे प्रकार चर्चीले जात आहेत. त्यांच्या तक्रारीनंतर अवैद्य व्यवसायिकांना चांगला चाप लागण्याची शक्यता आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. वडनेरे यांनीही गांभीर्याने लक्ष घातल्याची चर्चा आहे.

विरोधात गुन्हा नोंद झाला. या प्रकरणी गणेश गोडसे, रामभाऊ काळे, अंकुश तुपे या तिघांना पोलीसांनी तातडीने अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक हंसाळे अधिक तपास करत आहेत.