Breaking News

सातारमध्ये प्रथमच होतयं भव्य कला प्रदर्शन 2019


शेंद्रे / प्रतिनिधी : मानवी आयुष्याची सहज प्रेरणा म्हणजे कला होय कला माणसाला सुसंस्कृत बनवते कलेचे अधिष्ठान लाभलेला समाज स्वस्थ, शांत आणि संमृध्द बनतो त्यासाठी कलेला प्रोत्साहान मिळायला हवं याच उद्देशाने गुलमोहर ग्रुप सातारच्यावतीने सातारा परिसरातील नामवंत चित्रकार, नवोदित चित्रकार, हौसी चित्रकार, शिल्पकार, छायाचित्रकार यांचे भव्य कला प्रदर्शन 2019 हे पाच दिवसांकरिता आयोजित केले आहे. 

प्रदर्शनातील निसर्गचित्र व्यक्तिचित्र, कंम्पोझिशन, क्रियेटीव्ह चित्र तसेच छायाचित्र शिल्पकाम, मांडणीशिल्प, इत्यादी कलाकृतिचा समावेश आहे प्रदर्शनदरम्यान निसर्गचित्र,ऍमिनेशन शिल्पकला व्यक्तिचित्र, छायाचित्र प्रात्यक्षिके तसेच आंतरराष्ट्रीय फोटोग्राफर हे फोटोग्राफीवर स्लाइडशो व मार्गदर्शनपर बोलतील मान्यवर कलाकार पुणे, इलकरंजी, बेंगलोर, सिंधुदुर्ग, सातारा यांचे रोज सकाळी 9 ते 12 दुपारी 4 ते 6 मध्ये प्रात्यक्षिके होणार आहेत तसेच शालेय लहान विद्यार्थी यासाठी क्रिएटिव्ह कला अन्तर्गत क्राप्टपेपर बॅग इत्यादी. दि.19 व 20 एप्रिल रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत मार्गदर्शनपर वर्कशॉप होईल, तरी सातारमधील सर्व कलारसिकांनी कला प्रदर्शन 2019 ला अवश्य भेट देवून कलाप्रदर्शनचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे प्रदर्शन स्वयंवर हॉल, सिटी पोस्टासमोर, राजपथ सातारा येथे होणार आहे.