Breaking News

शक्तीप्रदर्शनाने 26 तारखेला मोदी वाराणसीत अर्ज भरणार


वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी लंकापासून ते दशाश्‍वमेध घाटापर्यंत असा 10 किलोमीटर रोड शो करून त्यानंतर बाबा विश्‍वनाथ यांचे दर्शन घेऊनच वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेतत या वेळी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली, नितीन गडकरी, सुषमा स्वराज यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. मोदी यांनी 2014 मध्येही जबरदस्त शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.


या शक्तीप्रदर्शनातून पूर्वोत्तर उत्तर प्रदेशला आकर्षित करण्याचा मोदी यांचा प्रयत्न असेल. याच पूर्वोत्तर उत्तर प्रदेशची जबाबदारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याकडे आहे.