Breaking News

‘मिशन शक्ती’चा कचरा 45 दिवसात नष्ट होईल : सतीश रेड्डी

सतीश रेड्डी साठी इमेज परिणाम

नवी दिल्ली : भारतीय अवकाश संस्था(इस्त्रो)ने मिशन शक्तीद्ारे अवकाशातील उपग्रह पाडण्याची अनोखी कामगिरी केली. मात्र या मिशन शक्तीमुळे अंतराळ संस्थाना धोका निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली होती. पंरतु मिशन शक्तीमुळे अंतराळ स्थानकाला धोका नसून येत्या 45 दिवसात हा कचरा (डेब्रिस) नष्ट होणार असल्याची माहिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे(डीआरडीओ) प्रमुख जी. सतीश रेड्डी यांनी दिला आहे.
भारताने 27 मार्चला ‘मिशन शक्ती’द्वारे अवकाशातील उपग्रह पाडण्याची यशस्वी कामगिरी केली. हे मिशन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मागील दोन वर्षापासून 150 वैज्ञानिक मेहनत घेतली होती. तसेच, अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ’नासा’ने ’मिशन शक्ती’वर टीका केली होती आणि या चाचणीमुळे अवकाशात सुमारे 400 तुकडे निर्माण झाले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला (आयएसएस) धोका निर्माण झाल्याचे सांगितले होते. डीआरडीओ प्रमुख जी. सतीश रेड्डी यांनी कोणताही हानी होणार नाही, याची पुर्ण काळजी घेतल्याचे स्पष्ट केले. या चाचणीनंतर निर्माण झालेला कचर्‍यांने धोका होऊ नये, म्हणून उपग्रह पाडण्यासाठी 300 किलोमीटरची कक्षा निवडण्यात आली होती. हा कचरा हळुहळु खाली येत असून संशोधकांच्या अंदाजानुसार येत्या 45 दिवसात हा कचरा नष्ट होईल, अशी माहिती रेड्डी यांनी दिली. भारताच्या मिशन शक्तीमुळे आयएसएसला धोका निर्माण झाला आहे. उपग्रह पाडण्याच्या अशा प्रकारची घटना भविष्यातील मानवी अवकाश मोहिमांसाठी अनुकूल नाही, असे विधान नासाचे जिम ब्रिडेन्स्टीन यांनी केले होते. मात्र, अमेरिकेचे संरक्षण विभाग पेंटागनने भारताच्या चाचणीमुळे कोणताही धोका नसल्याचे सांगितले आहे.

दीडशे वैज्ञानिकांची दोन वर्षापासून मेहनत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये या योजनेला परवानगी दिल्यानंतर भारतानेही या दिशेने काम सुरू केले. दोन वर्षापासून 150 वैज्ञानिकांनी या मिशनसाठी मेहनत घेतल्याची माहिती रेड्डी यांनी दिली. अवकाश आणि आण्विक क्षेत्रातील विशेषज्ञ राजेश्‍वरी पिल्लई राजगोपाल म्हणाले की भारताचा हेतू पूर्णपणे सुरक्षित आणि उत्तरदायी आहे. आम्ही चीनपेक्षा सुरक्षित चाचणी केली आहे. भारताचा रेकॉर्ड त्यांच्याहून चांगला आहे. आपण ही चाचणी केली आणि जगासमोर ठेवली. मात्र, चीनने हे परीक्षण 800 किलोमीटरपेक्षा अधिक उंचीवर केले. या चाचणीनंतर निर्माण झालेला कचरा अजूनही अंतराळात तरंगत आहेत. चीनने ते स्वीकारले नाही, असे त्यांनी सांगत मिशन शक्ती संपुर्ण सुरक्षित चाचणी असल्याचे स्पष्ट केले.