Breaking News

तीन राज्यात 50 ठिकाणी प्राप्तिकर विभागाचे छापे

आयकर विभागाने साठी इमेज परिणाम

कोटयवधींची रोकड जप्त; मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सचिवाच्या घरावर धाड

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांनाच देशभरात प्राप्तिकर विभागाने 50 ठिकाणी छापे टाकत कोटयवधींची रोकड जप्त केल्यामुळे खळबळ उडाली. दिल्लीच्या आयकर विभागाने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्वीय सचिव असलेले प्रवीण क्ककर यांच्या घरावर छापा टाकत 9 कोटींची रोकड जप्त केली. प्रवीण कक्कर यांच्या इंदूरमधील घरावर रविवारी पहाटे तीन वाजता अचानक आयकर विभागाने छापा टाकला. मध्य प्रदेशातील इंदूर, गोवा आणि दिल्लीत या तीन राज्यात 50 ठिकाणी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले.
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्पासाठी 11 एप्रिलला मतदान होणार आहे. पैशाचा गैरवापर थांबवण्यासाठी प्राप्तिकर विभाग सक्रिय झाले आहे. त्यावरुन मध्यरात्रीपासूनच विभागाने शोधमोहिम सुरू केली आहे. प्रवीण कक्कर यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा संशय आहे. कक्कर यांच्या घराची 15 अधिकारी झाडाझडती घेत आहेत. कमलनाथ मुख्यमंत्रिपदी झाल्यानंतर भुपेंद्र गुप्ता यांच्याजागी कक्कर यांची नियुक्ती करण्यात आली होती. कक्कर यांना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पदकानं सन्मानित केलं होतं. इंदोरशिवाय दिल्ली, भोपाळ आणि गोव्यामध्ये प्राप्तिकर विभागाने तब्बल 50 ठिकाणी रविवारी छापेमारी केली आहे. 50 ठिकाणी टाकलेल्या छापेमारीत कक्कर यांच्यासह रातुल पुरी, अमिरा ग्रुप आणि मोसेर बायर यांच्यावर प्राप्तिकर विभागाने धाड टाकली आहे. इंदोरशिवाय, भोपाळ आणि गोवामध्येही दिल्लीच्या प्राप्तिकर विभागाने छापे मारले आहेत. या देशभरातील कारवाईसाठी तब्बल 300 प्राप्तिकर आधिकार्‍यांचा समावेश आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, रातुल पुरी, अमिरा ग्रुप आदींच्या निवासस्थानासह कार्यालयांवरही छापे टाकले. दरम्यान, भोपाल येथील प्रतिक जोशी यांच्या घरावर टाकलेल्या धाडीत 9 करोड रुपयांची रोकड मिळाली आहे. सदर मालमत्ता प्रविण कक्क्ड यांच्याशी संबंधीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे इंदोरच्या उषा नगर येथील त्यांच्या सीएच्या घरावर देखील प्राप्तिकर विभागाने छापा मारला आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांचे निकटवर्तीय समजल्या जाणार्‍या आर के मिगलानी यांच्या घरावर देखील प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे.

कोण आहेत प्रविण कक्कड
मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री कमलान यांचे सचिव असलेले प्रविण कक्कड हे माझी पोलीस अधिकारी आहेत. 2004 साली त्यांनी पोलिसाच्या नोकरीचा राजीनामा दिला. यानंतर ते काँग्रेस नेते कांतिलाल भूरिया यांचे सचिव बनले. यानंतर 2018 साली मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बनलेल्या कमलनाथ यांचे ते स्वीय सचिव झाले. आतापर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार पोलीस सेवेत असताना त्यांची अनेक प्रकरणे समोर आली होती. त्यांच्यावर अद्याप चौकशी सुरु आहे.