Breaking News

राहुल गांधींच्या संपत्तीत 68 टक्क्यांनी वाढ


नवी दिल्ली : काँगे्रस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत 68 टक्क्यांनी वाढ झाली असून, त्यांच्याकडे एकूण 15.88 कोटी रुपयांची संपत्ती आहे. राहुल गांधी यांनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती उघड झाली आहे. राहुल गांधी यांच्याकडे दुकान, फार्म पाऊस, शेअर्स आदी 15 कोटींची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी आपली आई सोनिया गांधींकडून पाच लाख रुपयांचे खाजगी कर्ज घेतले आहे.


राहुल गांधींजवळ पाच कोटी 80 लाखांची स्थावर संपत्ती आहे. या संपत्तीत 40 हजार रुपयांची रोख, विविध बँक खात्यांमध्ये एकूण 17लाख 93 हजार 693 रुपये, शेअर आणि बाँडमध्ये पाच कोटी 19 लाख 44 हजार 682 रुपये आणि पीपीएफ खात्यात 39 लाख 89 हजार 037 रुपयांचा समावेश आहे. याशिवाय 2 लाख 91 हजार 367 रुपयांचे दागिने आहेत. राहुल गांधींकडे 10 कोटींची जंगम मालमत्ता आहे, असे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 8 कोटी 75 लाख 70 हजार रुपयांची गुरुग्राममध्ये 5838 वर्ग फुटांची दोन दुकाने आहेत. तसेच दिल्लीतल्या छतरपूरमध्ये बहिणी प्रियंका गांधींच्या 50 टक्के भागीदारीबरोबर एकूण 1 कोटी 32 लाख 48 हजार 284 रुपयांचे फार्म हाऊस आहे. एकूण मिळून जंगम मालमत्ता 10 कोटी आठ लाख 18 हजार 284 रुपये आहे. राहुल गांधींनी स्वतःची आई सोनिया गांधींकडून पाच लाख रुपयांचं खासगी कर्ज घेतले आहे. तसेच याशिवाय भाडेकरूंकडून मिळालेली 67 लाख एक हजार 904 रुपयांची रक्कम जमा आहे.