Breaking News

कर्मचारी निवडणूक कामात गुंतल्याने कामकाजाचा खोळंबा


पाटण / राजेंद्र लोंढे ः लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू झाली.निवडणुकीच्या कामासाठी पाटण तालुक्यातील सर्व ग्रामसेवक पोलिसांच्या मदतीला रस्त्यावर नेमल्याने ग्रामपंचायतीची सर्व कामकाज ठप्प झाले या मुळे नागरीकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. सार्वत्रिक निवडणुका आल्यानंतर शासकीय यंत्रणा सक्रीय होते पण आता पोलीसांच्या सोबतीने ग्रामसेवकही पहारेकरी झालेत. या निवडणूक काळात पाटण-कराड मार्गावर वाहन तपासणी सुरू केली आहे.त्यांचे सोबत ग्रामसेवक आहेत. आर्थिक वर्ष अखेरची व सर्वसामान्य जनतेची प्रकरणे ठप्प झाली आहेत. गरीबांच्या घरांच्या बांधकामाची गती थांबली.तर पोलीसांचे काम वाढले आजुन दिवस असेच थांबावे लागणार आहे.