Breaking News

पार्श्र्वनाथ नागरी सहकारी पतसंस्थेला पावणेचार कोटींचा नफा


कराड / प्रतिनिधी - श्री पार्श्र्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कराड ता. कराड या संस्थेस 31 मार्च 2019 रोजी संपणार्या आर्थिक वर्षात 3 कोटी 87 लाख रूपये नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन राजीव शहा व व्हा. चेअरमन सुहास शहा व सर्व संचालक यांनी दिली. दि. 31 मार्च 2019 ला संस्थेच्या ठेवी 119 कोटी, कर्जवाटप 90 कोटी व एकूण व्यवसाय 209 कोटीवर पोचला आहे. संस्थेचे राखीव व इतर निधी रक्कम 32 कोटींचे आहेत. व वसुल भागभांडवल 1.56 कोटी आहे. चालू वर्षीही नेट एनपीएचे प्रमाण शून्य टक्के राखणे सभासद व ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद व सहकार्यामुळे शक्य झाले आहे. याचच परिणाम म्हणजे सन 2018-19 करीता संस्थेस निव्वळ नफा 3.87 कोटी झाला आहे.

संस्थेच्या यशामध्ये सर्व सभासद, ठेवीदार तसेच कर्जदार यांचा वाटा मोलाचा आहे. व त्यांनी संस्थेवर दाखविलेल्या विश्र्वासामुळे व कर्ज पतरफेडीमुळे हे सातत्य राखणे शक्य झाले आहे.

संस्थेचे सभासदांना मोफत सर्जीकल इक्वीपमेंटस वापरणेस देणेसह अन्य सामाजिक उपक्रमांमध्येही संस्थेने भाग घेतला आहे. व त्याकरीता दिली जाणारी मदत यापुढेही सुरूच राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्थेचे सभासद, ठेवीदार व ग्राहकांनी संस्थेच्या सर्व संचालक मंडळ व सेवक वर्गाचे अभिनंदन केले.