Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पाण्याचे वाटप

 

पारनेर/प्रतिनिधी : महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती राहुलनगर मिञमंडळ, पारनेर तालुका पत्रकार संघ व भारतीय बौध्द महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने पिण्याचे पाणी वाटप करून महामानव डॉ.बाबासाबेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. 
 
जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या शुभहस्ते प्रतिमापुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रसंगी पत्रकार संघाचे संस्थापक संजय वाघमारे, नगराध्यक्ष वर्षा नगरे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मार्तंडराव बुचुडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास आबुज, बहुजन क्रांती मोर्चाचे संघटक राजेंद्र करंदीकर, आरपीआय युवक अध्यक्ष अमित जाधव, भारतीय बौध्द महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष विरेन्द्र पवार, बामसेफचे तालुकाध्यक्ष अविनाश देशमुख, पञकार विनोद गोळे, उदय शेरकर, मनसेचे शहरप्रमुख वासिम राजे, माजी सरपंच बाळासाहेब नगरे, सामाजिक कार्यकर्ते भाउसाहेब खेडेकर, शरद पवळे, शिरिष साळवे, संदिप खेडेकर यांनी केले.