Breaking News

पशुपक्षांसाठी महाविद्यालयात लाकडी खोक्यांची घरटी


पारनेर/प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज पारनेर महाविद्यालयाने सतत पडणारा दुष्काळ, सध्याचा भीषण दुष्काळ तसेच माणसांबरोबर पशुपक्षांनाही अतिशय तीव्रतेने जाणवणारा दुष्काळ लक्षात घेऊन महाविद्याालय सातत्याने नवनवे उपक्रम राबवत असते. महाविद्यालयाच्या संकल्पेतून महाविद्यालय परिसरात गेल्या नऊ-दहा वर्षांपासून पशुपक्षांसाठी लाकडी खोक्यांची घरटी तसेच पाणी व्यवस्था केली जात आहे. या उपक्रमामुळे दिवसेंदिवस पशुपक्षांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

निसर्ग मानवाला नेहमीच समृद्ध करत आलेला आहे. या निसर्गाचे, पशुपक्षांचे अनंत उपकार मानवी जीवन समृध्द, सुजलाम, सुफलाम बनविण्यासाठी झालेले आहेत. म्हणूनच त्या निसर्गाची, पशुपक्षांची काळजी घेणे हे आपल्या संर्वांचे कर्तव्य आहे. याच भावनेतून, विचारातून महाविद्यालयाच्या संकल्पेतून हा उपक्रम राबवत आहे.

महाविद्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपांची संख्या, वनस्पती उद्यान असल्यामुळे पशुपक्षांचा वावर नेहमीच महाविद्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात असतो. यामुळे परिसरातील वातावरण नेहमीच पशुपक्षांच्या किलबिलाटाने भारावलेले असते. त्यामुळे परिसरात नेहमीच आनंदाचे वातावरण असलेले दिसून येते. महाविद्यालयातील या आनंदमयी, निसर्गरम्य वातावरणामुळे परिसरातील अनेक नागरिक सकाळ, संध्याकाळ परिसरात फिरण्यासाठी येत असतात. या सर्व उपक्रमाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे, प्रा. दत्तात्रय घुंगार्डे, डॉ. सुधीर वाघ, प्रा.विरेंद्र धनशेट्टी, प्रा. भिमराज काकडे, प्रा. युवराज वाघिरे, डॉ.हरेश शेळके, कार्यालयीन अधीक्षक सुनिल चव्हाण, अशोक व्हरकटे, तुकाराम दातीर, संभाजी बर्डे, सुभाष बर्डे, सुधाकर पानपाटील या सर्वांनी एकत्र येऊन नियोजन केले आहे.