Breaking News

पारनेरला काळभैरवनाथ यात्रा उत्सव


पारनेर/प्रतिनिधी: पारनेर येथील काळ भैरवनाथ दोन दिवसीय यात्रा उत्सव बुधवार व गुरुवारी आयोजित करण्यात आले आहे.

काळभैरवनाथ यात्रेला बुधवार दि.17 पासून सुरुवात होत असून बुधवारी देवाला मान्यवरांच्या हस्ते हळद लावण्याचा कार्यक्रम होत आहे. गुरुवारी काळभैरवनाथांचा पंचामृत अभिषेक, मंगलस्नान, महाआरती व लग्नसोहळा सोहळा संपन्न होणार आहे. तसेच पुणेवाडी येथून पारनेर भेटीस आलेल्या भैरवनाथ महाराजांच्या पालखीचे पारनेरच्या मुख्य बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात येते.