Breaking News

उर्मिला मातोंडकरविरोधात तक्रार दाखल

उर्मिला मातोंडकर साठी इमेज परिणाम

हिंदू धर्माविषयी केलेले आक्षेपार्ह वक्तव्य भोवले
मुंबई : लोकसभा निवडणुकांची रिंगणात उतरलेल्या उर्मिला मातोंडकर विरोधात हिंदू धर्माविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी भाजपच्या सुरेश नखुआ यांनी उर्मिलाविरोधात तक्रार दाखल केली आहे. एका कार्यक्रमात बोलतांना मातोंडकर म्हणाल्या होत्या की, हिंदू धर्म हा जगातील सर्वाधिक हिंसक धर्म झाला आहे. या वक्तव्यानंतर हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचं म्हणत त्यांनी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नाखुआ यांनी दाखल केलेल्या या तक्रारीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि एका पत्रकाराचाही उल्लेख असल्याचे म्हटले जात आहे. भारतीय दंडसंविधानाच्या कलम 295 - अंतर्गत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. खुद्द नाखुआ यांनीच त्याची प्रत सोशल मीडियावरही पोस्ट केली आहे. उर्मिलाने ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात, ‘हिंदू हा सगळ्यात जास्त हिंसाचाराकडे झुकणारा धर्म असल्याचे म्हटले होते’. या धर्माचे स्वरुप कित्येक वर्षांपासून असेच असल्याचे अनेकांकड़ून भासवण्यात आले होते, असेही तिने म्हटले होते. तिच्या या वक्तव्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचे कारण देत भाजपचे प्रवक्ते सुरेश नाखुआ यांनी पवई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. उर्मिला मातोंडकरने राहुल गांधी यांच्या सांगण्यावरूनच हे वक्तव्य केल्याचा आरोप सुरेश नाखुआ यांनी केला आहे. भारतात एक प्रकारे हुकूमशाहीचीच सत्ता होती, असं म्हणत काँग्रेसच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उर्मिलाने देशात कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हते, असेही लक्षवेधी वक्तव्य केले होते. त्यामुळे आता उर्मिलाविरोधात दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीवर तिची काय प्रतिक्रिया असणार आहे, किंवा या प्रकरणात पुढील कारवाई काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.