Breaking News

वडूज उरुस कमेटी अध्यक्षपदी दाऊदखान मुल्ला यांची फेरनिवडवडूज / प्रतिनिधी : येथील सिध्दीलाल शाहबाबा उरुस कमेटीच्या अध्यक्षपदी मानवाधिकार संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते दाऊदखान महंमदअल्ली मुल्ला यांची सर्वानुमते फेरनिवड झाली आहे.

दर्ग्यात झालेल्या बैठकीत श्री. दाऊदखान यांची अध्यक्षपदी तर दिलावर सायकल मार्टचे संचालक दिलावर दगडू मुल्ला यांची उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. सचिवपदी इसाक शहाबुद्दीन मुल्ला, खजिनदारपदी हाजी सादिक बशीर मुल्ला यांच्याही सर्वानुमते निवडी करण्यात आल्या.

बैठकीस मुस्लीम ओ.बी.सी. संघटनेचे तालुकाध्यक्ष महंमद शरीफ आत्तार, युवा कार्यकर्ते इम्रान बागवान, अमीन मुल्ला, डॉ. अकबर काझी, बरकत मुल्ला, सिराज शिकलगार, अमिन शिकलगार आदिंसह मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. मुल्ला म्हणाले, समाजाने आपल्यावर मोठ्या विश्वासाने सलग दुसर्‍या वर्षी जबाबदारी सोपवली आहे. याची जाणीव ठेवून चालू वर्षीच्या कार्यक्रमात गेल्या वर्षीपेक्षा वाढ केली जाईल. ऊरूस यात्रेमध्ये धार्मिक, करमणूकीचे कार्यक्रम आयोजित करताना युवक व इतर सर्वसमाज घटकांना सामावून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल.