Breaking News

निवडणुकीच्या प्रशिक्षणावरून परतणाऱ्या शिक्षिकेचा अपघाती मृत्यू पट्टा


शेवगाव/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचे शेवगाव येथील प्रशिक्षण आटोपून पाथर्डीकडे निघालेल्या भक्ती विनोद गांधी (वय ३२, श्री तिलोक जैन विद्यालय पाथर्डी ) या शिक्षिकेचा अपघाताने मृत्यू झाला.

प्रशिक्षणावरून परतत असताना शिक्षक दाम्पत्याच्या मोटारसायकलला पाठीमागून भरधाव येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातातील शिक्षिकेचा मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमीझाले. ही घटना रविवारी सायंकाळी सव्वापाचच्या दरम्यान शेवगाव-तिसगाव रस्त्यावर भगूर शिवारात घडली.

त्यांचे पती विनोद गांधी हे जखमी आहेत. नगर येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. अपघातग्रस्त गांधी शिक्षक दाम्पत्य हे लोकसभा निवडणुकीच्या शेवगाव येथील प्रशिक्षणातसहभागी झाले होते. सकाळी ९ ते ५ वेळेतील प्रशिक्षण आटोपून पाथर्डीकडे घरी जात असताना कारच्या जोरदार धडकेने हा अपघात घडला.अपघातानंतर शेवगाव येथील ग्रामीण रूग्णालयातत्यांना हलविण्यात आले. तेथून नगर येथे खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर तेथे भक्ती गांधी यांना मृत घोषित करण्यात आले.