Breaking News

घारगाव येथे डॉ.आंबेडकर यांची जयंती साजरी


श्रीगोंदे/प्रतिनिधी:घारगाव येथे अंकुर ग्रुप तर्फे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.

घारगाव येथे घोटी ते मारुती मंदिर या मार्गाने या दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांची फेरी काढण्यात आल्या. त्या नंतर घारगावच्या प्रथम नागरिक सरपंच अरूना खोमणे यांच्या हस्ते दोन्ही महापुरुष प्रतिमांचे पूजन करण्यात येऊन जयंती उत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला. या जयंती उत्सव सोहळ्यास प्रसिध्द इतिहास संशोधक व अभ्यासक शिवश्री श्रीमंतजी कोकाटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उत्तरेश्‍वर मोहोळकर ( सत्यशोधक समाज प्रचारक), विक्रम कांबळे (सत्यशोधक समाजाचे प्रचारक) रघुनाथ खामकर (मा.पंचायत समितीचे सदस्य), सरपंच अरुणाताई रमेश खोमणे, जिजाराम खामकर(संचालक श्रीगोंदे सहकारी साखर कारखाना), बापूराव शिंदे, नारायण खामकर (उपसरपंच), अमित खामकर, डॉ.चंद्रशेखर कळमकर, बापूराव निंभोरे, प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक अविनाश निंभोरे, पर्यवेक्षक नानासाहेब साबळे उपस्थित होते.